मुंबईतील घटनेने राज्यात खळबळ! बापाने मुलीवर पेट्रोल टाकून जीवंत जाळले…


मुंबई : पित्याने आपल्या दत्तक मुलीवर पेट्रोल शिंपडून पेटवून दिल्याची हृदयद्रावक घटना मुंबईतील धारावीतून समोर आली आहे. या घटनेत एका २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.

मोहिनी रामजीत असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. नंदकिशोर पटेल असे अटक करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मोहिनी घराबाहेर बसली असताना मंगळवारी ही घटना घडली. वडील आणि मुलीमध्ये काही कारणावरून भांडण झालं होतं. भांडण इतकं वाढलं की वडील नंदकिशोर पटेल यांनी मोहिनीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं.

या आगीत मोहिनी ७० टक्के भाजली होती. कुटुंबीयांनी तिला गंभीर अवस्थेत सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दत्तक मुलगी मोहिनी ही काजल आणि पटेल यांच्यासोबत धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये राहत होती. पटेल देखील काजलची दत्तक मुलगी मोहिनीला स्वतःची मुलगी मानत होते, परंतु गेल्या काही महिन्यांत त्यांच्यातील संबंध बिघडले.

काजल आणि मोहिनी आपल्याकडे लक्ष देत नसल्याचं पटेल यांना वाटत होतं. तो त्यांची पूर्ण काळजी घेत होता. यामुळे संतापलेल्या त्याने त्याला धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केले. अनेक दिवस रुग्णालयात जीवन-मरणाची झुंज देत असलेल्या मोहिनीचा शनिवारी मृत्यू झाला. पोलिसांनी आता हे प्रकरण खुनाचा प्रयत्न तसेच खुनाच्या कलमात समाविष्ट करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!