१२ वीेच्या प्रवेश पत्रावर परीक्षा मंडळाचा सावळा गोंधळ, पालक-विद्यार्थ्यांचा संतापले, नेमकं काय झालं?

पुणे : यावर्षी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यंदा राज्यात परीक्षार्थींची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३५ हजारांनी वाढली आहे. यामुळे परीक्षेचे नियोजन देखील तसंच करावं लागणार आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षार्थींच्या संख्येत १९ हजारांनी तर बारावीच्या परीक्षार्थींच्या संख्येत १७ हजारांनी वाढ झाली आहे.

यावेळी एक गोंधळ बघायला मिळाला. विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले परंतु आता या हॉल तिकिटांवरील गोंधळ समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेला विषय हॉल तिकिटावर आला नाही. त्याऐवजी दुसराच विषय हॉल तिकिटावर आलेला आहे. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत कोल्हापूरमधील पालक महाविद्यालयात पोहचले असून प्रशासनाला जाब विचारत आहेत. यामुळे आता यामध्ये बदल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत पालकांनी देखील विनंती केली आहे. महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले आहेत.

असे असताना परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या विषयांपेक्षा वेगळे विषय आल्याने पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. कोल्हापुरातील पालक विमला गोयंका महाविद्यालयात पोहचले होते. एकाच वेळी महाविद्यालयात मोठ्या संख्येने पालक जमा झाल्याने गोंधळ उडाला आहे.
दरम्यान, विद्यार्थी बारावीत जो विषय शिकले. ज्या विषयाचा अभ्यास केला, तो विषय हॉल तिकिटावर दिलेला नाही. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. वर्षभर दुस-या विषयाचा अभ्यास करून हॉल तिकिटावर वेगळेच विषय आल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. यामुळे यामध्ये बदल करण्याची मागणी केली जात आहे.