मुंबईत एका पोराला जरी धक्का लागला तर राज्यात…!! मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे आणि सगेसोयरे अध्यादेश लागू करावा या प्रमुख मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचे समाजाला आवाहन केले आहे. 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. सध्या ते मराठवाड्यात संवाद दौरा करत आहेत. यामुळे वातावरण तापले आहे.

परभणीत माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस हे गोव्यात ओबीसी मेळाव्यासाठी गेले होते. त्यांनी तिथे जाऊन ओबीसी नेत्यांचे कान भरल्याचे ते म्हणाले. आंदोलनाच्या काळात राज्यात दंगल भडकवण्याचा डाव असल्याचे ते म्हणाले. मला याची कुणकुण लागल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच जरांगे म्हणाले, आमचं आंदोलन शांततेत होणार आहे. फडणवीस यांनी जर तसं काही करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र कायम स्वरुपी बंद राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मोठा त्रास सहन करावा लागेल असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसी अधिवेशन घेतलं, आणि त्यांनीच तेथे सांगितलं मी ओबीसीसाठी लढणार.

मग मराठा समाज साठी कोण लढणार, दलित मुस्लिम समाजाला तुम्हाला मतदान केलं नाही का? असेही ते म्हणाले. तुम्ही काय हल्ले घडून आणणार का मागच्या सारखे असा सवाल करत एका पोराला जरी धक्का लागला तर संपूर्ण राज्य बंद करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. यामुळे आता मुंबईत काय होणार हे लवकरच समजेल.
मराठा समाज बद्दल किती द्वेष देवेंद्र फडणवीसमध्ये आहे हे सिद्ध झाले. मीडियाने देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले म्हणून मुंबईला जाणार, तर ते म्हणाले ते पोलीस बघून घेतील. बघून घेतील म्हणजे नेमकं काय, फडणवीस म्हणजे पोलीस आणि पोलीस म्हणजे फडणवीस हे समीकरण राज्यात आहे. असेही जरांगे पाटील म्हणाले.