देशाचा शत्रू अखेर ताब्यात!! 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणलं, दिल्लीत अद्भुत सुरक्षा व्यवस्था..

नवी दिल्ली : मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं आहे, राणाला स्पेशल विमानानं दिल्लीमध्ये आणण्यात आलं आहे. पालम विमानतळावरून त्याला एनआयएच्या हेडक्वॉर्टरला नेलं जाणार आहे. सुरक्षा यंत्रणांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चार इनोव्हा, दोन सफारी, जॅमर, बॉम्ब विरोधी पथक या विमानतळावर दाखल आहे.
26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा याला आणणारं स्पेशल विमान इंडियन एअरस्पेसमध्ये दाखल झालं आहे. दिल्लीत हे विमान लँड झालं आहे. तहव्वुर हुसैन राणा याची एनआयए कोर्टात हजेरी होण्यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टच्या गेटबाहेर कव्हरेज करत असलेल्या पत्रकारांचे आयडी कार्ड तपासले जात आहेत. सतर्कतेने काम सुरू केले आहे. मीडिया प्रतिनिधींना कोर्टमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
तहव्वुर हुसैन राणा सकाळी 10 या वेळेत पोहोचण्याची शक्यता होती, मात्र इंधन भरण्यासाठी मध्ये एक थांबा घेण्यात आला. त्याला कुठून एनआयए मुख्यालयात आणायचे, याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला जाईल. एनआयए मुख्यालयातील इन्व्हेस्टिगेशन सेलमध्ये केवळ 12 जणांना प्रवेश दिला जाणार आहे. हा सेल तिसऱ्या मजल्यावर तयार करण्यात आला आहे.
स्वॅट कमांडोंना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. तहव्वुर हुसैन राणा याच्या एनआयए कोर्टातील हजेरीपूर्वी पटियाला हाऊस कोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, त्यामध्ये एनआयएचे डीजी सदानंद दाते, आयजी आशीष बत्रा आणि डीआयजी जया रॉय यांचा समावेश आहे.
या ठिकाणी अनेक लेअरची सेक्युरिटी तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे SWAT कमांडोच्या सुरक्षेतच त्याला नेण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांची अनेक वाहने राणाच्या ताफ्याला एस्कॉर्ट करतील. त्याला बुलेटप्रुफ गाडीतून नेलं जात आहे.
एनआयए मुख्यालयासमोर सामान्य नागरिकांची वर्दळ थांबवण्यात आलेली आहे. एनआयएच्या समोर असलेले जवाहरलाल नेहरू मेट्रो स्थानकाचे गेट क्रमांक -2 देखील सुरक्षाच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहे. दक्षिण विभागाचे डीसीपी एनआयए कार्यालयात पोहोचले आहेत आणि कार्यालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करत आहेत.