पुण्यात 10 मे रोजी भव्य रोजगार मेळावा, तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने प्रत्येक महिन्याला रोजगार मेळावा अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये रोजगार मेळावा येत्या 10 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत.
नोकरी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यामध्ये नोकरीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे.
याचाच एक पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी या कार्यालयामध्येच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ही एक चांगली संधी असणार आहे.
Views:
[jp_post_view]