मध्यमवर्गीयांसाठी आता इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटऱ्या घेणं सुलभ! अर्थसंकल्पात मोठी घोषणा…!
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात इलेक्ट्रिक वाहने आणि लिथियम आयन बॅटरीबाबत मोठी घोषणा केली होती. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली. त्या म्हणाल्या की, सरकार इलेक्ट्रिक वाहने आणि लिथियम आयन बॅटरीच्या किमती कमी करणार आहे.
सरकारने केलेल्या या घोषणेचा थेट परिणाम इलेक्ट्रिक वाहने आणि लिथियम आयन बॅटरी खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर होणार आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी स्वस्त होणार आहे.
Views:
[jp_post_view]