मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड, अजित पवारांची मोठी खेळी…
मुंबई : अजित पवारांनी काल सर्वांना धक्का देत भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. असे असताना आता आपलीच राष्ट्रवादी असल्याचे अजित पवार सांगत असल्याचे दिसून येत आहे.
अजित पवार यांनी सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात केल्याची माहिती आहे. तसेच थोड्याच वेळात अजित पवार या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. देवगिरीवर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे आता पक्ष नेमका कोणाचा आणि चिन्ह कोणाच असा प्रश्न पुन्हा एकदा निर्णय होणार आहे. शिवसेनेसारखी परिस्थिती सध्या राष्ट्रवादीत आली आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी अजित पवारांनी सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून तटकरे यांनी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी काल शपथ घेतलेल्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार देखील आक्रमक झाले असून ते देखील दौऱ्यावर गेले आहेत