निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना अलर्ट, प्रचार संपण्याआधीच काढला नवा आदेश..

पुणे : तब्बल नऊ वर्षानंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा 10 दिवसाच्या रणधुमाळीनंतर आज थंडावणार आहेत. अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पत्रकाच्या प्रसिद्धीपासून सर्व,राजकीय पक्षांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे.

महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यांनी दिली आहे.
पुण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकाच्या निवडणुकासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर रोजी निवडणूकीची घोषणा केली तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने आपला बालेकिल्ला राखण्यासाठी दिग्गज रिंगणात उतरले. राजा निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आल आहे.

त्यानुसार कोणत्याही राजकीय पक्षाला प्रसारमाध्यमांतून कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाही. त्यामुळे जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर मुद्रित माध्यमांच्या जाहिरातीच्या पूर्वप्रमाणनाचा किंवा परवानगीचा प्रश्न उद्भवत नाही. यासंदर्भातील सविस्तर बाबी राज्य निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण आणि जाहिरात प्रमाणन आदेश २०२५ मध्ये नमूद केल्या आहेत