एकनाथ शिंदे यांचा आमदार आला अडचणीत; मारलेल्या वाघाचा दातावरून वन्यजीव कायद्यानुसार आमदार महोदयांवर गुन्हा दाखल..!!

Eknath Shinde : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १९८७ मध्ये वाघाची शिकार करून त्याचे तुकडे गळ्यात घातल्याचा पराक्रम या आमदार महोदयांनी केला होता. त्यानंतर आता एक दात जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की त्यांनी ८० च्या दशकात वाघाची शिकार केली होती. आणि गळ्यात त्याचे तुकडे घातले होते. आता बुलढाण्यात एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
वनविभागाला वाघाचा दात आढळून आला आहे. त्यानुसार वाघाचे दात फॉरेन्सिक ओळखीसाठी पाठवण्यात आले असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटातील या आमदाराने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून दावा केला होता की त्यांनी वाघाची शिकार केली होती.
व्हिडिओची दखल घेत वनविभागाने कारवाई सुरू करत वाघाचे दात जप्त केले. बुलढाणा परिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे यांनी सांगितले की, आमदाराविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.