Eknath Shinde : मनोज जरांगेंची तब्येत खालावली, मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा? थोड्याच वेळात पत्रकार परिषद…


Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यावर कायदा करत त्याला मान्यता न दिल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सातवा दिवस अजून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.

उपोषणाचा सातवा दिवस असल्याने आणि शरीरात अन्न पाणी नसल्याने मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून सरकार विरोधात रोष देखील व्यक्त केला जात आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सकाळी ९ वाजता जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सगे-सोयरे अध्यादेशाचा कायदा बनवण्यासाठी मुख्यमंत्री अधिवेशन बोलवण्याची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Eknath Shinde

सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा बनवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अधिवेशन बोलावण्याची घोषणा करू शकतात. सध्या सरकारने अधिवेशनाची तारीख २२ फेब्रुवारी ठरवली आहे.

मात्र, मनोज जरांगेंचं आंदोलन आणि मराठा समाजाचा रोष पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २२ फेब्रुवारीच्या आधीच विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करू शकतात. यासोबतच मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाबाबत नेमका काय अहवाल दिला, याबाबतची माहिती पत्रकारपरिषदेत देऊ शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!