Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले, कोस्टल रोडचा विस्तार विरार, पालघरपर्यंत करणार…


Eknath Shinde : वाढवन बंदराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.पालघरमधील वाढवण बंदराचा भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमीपूजन सोहळा पार पडला.

या प्रकल्पासाठी तब्बल ७६००० कोटी खर्च करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणात मुंबईतील कोस्टल रोडबद्दल मोठी घोषणा केली आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक म्हणून मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाला ओळखले जाते. या सागरी किनारा रस्त्याला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असे नाव देण्यात आले आहे. कोस्टल रोडला पश्चिम किनारपट्टीवरील एक्सप्रेस वे म्हटले जाते.

दक्षिणेकडील मरीन लाईन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना जोडणारा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. सध्या हा कोस्टल रोड मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत खुला करण्यात आला आहे. आता या कोस्टल रोडबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

देशातील टॉप टेन बंदरात भारताचा समावेश होणार आहे. जगाच्या नकाशावर डहाणू पालघर येणार आहे. ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या बंदरामुळे आयात आणि निर्यातीला चालना मिळेल. देशातील कंटेनर हँडलिंगची क्षमता वाढेल. भारत जागतिक व्यापारातही उतरेल. Eknath Shinde

१२ लाखांहून अधिक रोजगार मिळेल. आदिवासींना नोकऱ्या मिळतील. स्थानिकांना विशेष ट्रेनिंग देणारे ३० कार्यक्रम निश्चित करण्यात आलं आहे. मच्छिमार आणि स्थानिकांचं हित पाहणार आहोत. मोदींनी नेहमी जे प्रकल्प केले. त्यात स्थानिकांना न्याय दिला आहे.

शिवाजी महाराजांनी ३५० वर्षापूर्वी सागरी मार्गाचं महत्त्व ओळखलं होतं. त्यामुळे महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपण काम करत आहोत. कोस्टल रोड ते अटल सेतू त्यातूनच राहिलं आहे. कोस्टल रोड विरार ते पालघरपर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे. पालघरला विमानतळ करण्याचा मान पंतप्रधान ठेवतील.

१ हजार कोटींची गुंतवणूक होईल. रोजगार निर्माण होईल. मुंबईला वैश्विक फिनटेक हबमध्ये बदलण्याचं काम करणार आहोत. मोदींनी तशी घोषणा केली आहे. महाराष्ट्र २०२६ पर्यंत भारताच्या तीन ट्रिलियन लक्ष्याला साकार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!