Eknath Shinde : माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदीत, लाखो वारकरीही दाखल…

Eknath Shinde : आषाढी वारी पालखी प्रस्थान निमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी दर्शन आणि इंद्रायणी प्रदुषण पाहणी दौ-यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी तीन वाजता मंदिरामध्ये येणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदीत येणार आहेत. दुपारी तीन वाजता ते आळंदीत असणार आहेत. यावेळी ते पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणार असून, त्यानंतर इंद्रायणी नदी प्रदूषणाची देखील पाहणी करणार आहेत. Eknath Shinde
यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी पालखी सोहळ्यात मंदिरात येत दर्शन घेतले होते; मात्र मुख्यमंत्री प्रस्थान सोहळ्यात येण्याची पहिलीच वेळ आहे.

इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेतात याबरोबरच पालखी सोहळ्यातील दिंड्यांना २० हजार रूपयांचे अनुदान वाटप बाबत टिकेची झोड उटल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.