Eknath Shinde : राजकारणात खळबळ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभेत शिवीगाळ, ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याला अटक..


Eknath Shinde : भरसभेत मुख्यमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करणे दत्ता दळवी यांना भोवले आहे. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेतून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दळवी यांच्यावर गुन्हा झाला होता. आता त्यांना राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. Eknath Shinde

यावरूनच शिंदे गटाचे नेते त्याचबरोबर कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते. जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं असा आरोप शिंदे गटाने करत पोलिसात तक्रार दाखल केली.

दरम्यान शिंदे गटाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे, त्यांना आजच कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आता दत्ता दळवी यांना अटक होताच ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!