Eknath Shinde : अखेर महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांचं थेट भाष्य, नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी कालच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील, भाजप जो निर्णय घेईल तो एकनाथ शिंदे म्हणून आणि शिवसेना म्हणून मान्य असेल असे सांगितले आहे.
बाळासाहेबांचे जे स्वप्न होतं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे ते स्वप्न मोदी आणि शाहांनी पूर्ण केलं, त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय होईल, तो निर्णय मान्य असेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
त्यामुळे आता महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र विधान सभा निवडणूक निकाल २०२४ झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता देशासह महाराष्ट्राला लागली होती. अखेर निकालाच्या चार दिवसानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
दरम्यान, उद्या मोदी, शाह साहेबांबरोबर मी, अजित पवार, फडणवीस यांची बैठक आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत आम्ही सरकार संदर्भात निर्णय घेऊ,असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.