Eknath Shinde : जुन्या पेन्शनबाबत मोठी अपडेट, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा, म्हणाले..


Eknath Shinde : जुनी पेन्शन योजना लागू करा,अशी मागणी करत राज्यात ठिकठिकाणी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. आज मुख्यमंत्री शिंदेंनी जुनी पेन्शन योजनेविषयी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत जुनी पेन्शनचे निवदेन मांडले. पेन्शन योजना अंतिम टप्प्यात आली आहे. याचा प्रस्ताव अर्थसंकल्पाच्या सत्रात मांडला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हटले आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, अशी ग्वाही देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन केले आहे. Eknath Shinde

बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली आहे.

दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या आंदोलनाला शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

आरोग्य सेवेतील कर्मचारी सुद्धा संपात सहभागी झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत शासन जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!