कर्नाळा बँकेतील घोटाळ्यात ईडीची कारवाई ;’ या’ आमदाराच्या मालमत्तेचा होणार लिलाव

मुंबई : कर्नाळा बँकेतील 500 कोटींच्या घोटाळ्याबाबत ईडीने मोठी कारवाई केली आहे. बँकेतील ठेवीदार आणि गॅरेंटर यांचे पैसे परत करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे आदेश ईडीच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत.

बँकेचे माजी अध्यक्ष विवेक पाटील ५०० कोटींच्या घोटळ्याप्रकरणी मागील चार वर्षांपासून तळोजा कारागृहात आहेत..दरम्यान इडीच्या पीएमएलए न्यायालयात विवेक पाटील यांनी आपल्या ८७ मालमत्तांचे लिलाव करून त्याच्यातून पैसे उभे करण्याबाबत न्यायालयात कळवले आहे. पहिल्या टप्प्यात कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी आणि पोसरी येथील १०२ एकर जमीनीचा या करिता लिलाव केला जाणार आहे. यापैकी पोसरी येथील जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया सर्वात आधी केली जाणार आहे.
ईडीने दिलेल्या आदेशानुसार, पनवेलची प्रसिध्द कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि पोसरी येथील १०२ एकर जमिनीच्या लिलाव करण्यात येणार आहे. त्यामधून जमा होणाऱ्या रक्कमेतून गैरव्यवहारातील रक्कम वसूल केली जाणार आहे. सर्वांचे पैसे माघारी दिले जाणार आहेत.
