गुजरातला भूकंपाचे हादरे ! सूरतपासून २७ किमी अंतरावर 3.८ रिश्टरचे तीव्र धक्के…!


सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये आज (ता.११) रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.८ इतकी मोजली गेली. मात्र, यामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. गांधीनगर येथील आयएसआरनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू सूरतपासून २७ किमी आग्नेयला नोंदविला गेला आहे.

२६ जानेवारी २००१ रोजी गुजरातमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या काळात भूज आणि कच्छमध्ये प्रचंड विध्वंस झाला. या भूकंपामुळे १० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. २६ जानेवारीलाच २ हजार मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. यावेळी रुग्णालयांचेही नुकसान झाले. त्यामुळे बचावकार्यात अडचण निर्माण झाली होती.

भूकंपामागचे मुख्य कारण काय ?
भूकंप होण्याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीच्या आतील प्लेट्सची धडक. पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत ज्या सतत सरकत असतात. जेव्हा या प्लेट्स आदळतात तेव्हा तेथे फॉल्ट लाइन झोन तयार होतो आणि पृष्ठभागाचे कोपरे दुमडले जातात. पृष्ठभागाचे कोपरे दुमडल्याने तेथे दाब तयार होतो आणि प्लेट्स तुटू लागतात. या प्लेट्स तुटल्यामुळे आतील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधते, ज्यामुळे पृथ्वी हादरते आणि आपण त्याला भूकंप म्हणून ओळखतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!