जम्मू- काश्मीरमध्ये ३.६ रिश्टर स्केल तीव्रततेच्या भूकंपाचे धक्के…!

जम्मु-काश्मीर : तुर्कीच्या भयानक भूकंपानंतर देशभरात भूकंप म्हणले की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे यातच आज जम्मु काश्मीर पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. तब्बल ३.६ रिश्टर स्केल एवढी तीव्रता या भूकंपाची भूकंप मापकावर नोंदवली गेली.

जम्मू काश्मीरच्या कटरा येथून तब्बल ९७ किलोमीटर अंतरावर हे धक्के शुक्रवारी सकाळी पहाटे ५.०१च्या सुमारास जाणवले. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातही काही दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. तब्बल ३.६ रिश्टर स्केलवर एवढी त्याची तीव्रता होती. सुदैवाने या घटनेत काही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.काही नागरिक घाबरून हे घराबाहेर पडले होते. सुदैवाने भूकंपाची तीव्रता जास्त नव्हती. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नगिरीक दहशतीत आहेत.

