पुणे महापालिका निवडणुकीआधी भूकंप ; डॅशिंग चेहरा असलेल्या वसंत मोरेंची शरद पवारांना थेट ऑफर, म्हणाले….

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि पुण्यातील डॉशिंग चेहरा असलेल्या वसंत मोरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येणारी निवडणूक शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांनी जर एकत्रित लढवली तर एक वेगळं गणित पहायला मिळू शकतं, असं मत त्यांनी मांडत अप्रत्यक्षपणे शरद पवारांना ऑफर दिली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच राजकीय भूकंप घडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय म्हणाले वसंत मोरे?

लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. पुणे शहराची गणित ही इतरांपेक्षा वेगळं आहे. 2017 च्या निवडणुकीत सगळे पक्ष वेगळेवेगळे लढले होते. त्यावेळी शिवसेनाला 8 लाख 73 हजार मतदान झालं. मनसेला 3 लाख 23 हजार मतदान झालं. काँग्रेसला 5 लाख 26 हजार मतदान झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसला 13 लाख मतदान झालं. तर भाजपला 22 लाख मतदान झालं होतं. याची सगळी जुळवाजुळव केली तर शिवसेना, मनसे आणि शरद पवारांचा गट अशी युती केली तर 18 लाख मतदान होतं, असं गणित वसंत मोरे यांनी मांडण्याचा प्रयत्न केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, मनसे आणि शिवसेना यांची युती झाल्यात जमा आहे. राहतोय फक्त शरद पवार यांचा पक्ष… जर असं झालं तर महाविकास आघाडी सत्तेच्या दारात जाऊ शकते, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.त्यांनी आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी थेट राष्ट्रवादीला ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
