सालार’च्या पहिल्याच दिवशीच्या कमाईने उडवली झोप ; प्रभासचा जोरदार कमबॅक…

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा ‘सालार’ हा सिनेमा २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या आधीपासून चर्चेत असणाऱ्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने ‘जवान’ , ‘पठाण’ आणि ऍनिमल चित्रपटांना मागे टाकले आहे.
‘सालार’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रभासने जोरदार कमबॅक केलं आहे. अभिनेत्याचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या अॅक्शन थ्रिलर सिनेमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या सिनेमाची सिनेमा प्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.
कमाईचा विचार केला तर या चित्रपटाने ओपनिंग डेला ९५ कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी देखील दमदार कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने तब्बल ९०.७० कोटींची कमाई केली. दोन दिवसांत या चित्रपटची एकूण कमाई १४५.७० कोटी झाली आहे.
या दोन दिवसांत ज्याप्रकारे धमाकेदार व्यवसाय केला आहे. त्यावरून हा चित्रपट ओपनिंग वीकेंडला बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांपार कमाई सहज करेल असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे.