दत्ता गाडेचे कारनामे संपता संपेना! प्रवासी महिला ते भाजीवाली बाई, शरीरसुखासाठी…..

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी ७० तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर शिरूर येथे उसाच्या शेतातून अटक केली. मात्र, तपासादरम्यान त्याच्या गुन्हेगारी कृत्यांबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.
शिरूर परिसरातील एका लॉजबाहेर बसून तो सतत येणाऱ्या महिलांवर पाळत ठेवत असे. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून तो छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ तयार करत असे. हे व्हिडिओ त्यांच्याविरोधात वापरत, महिलांना ब्लॅकमेल करत आणि त्यांच्या कमजोर जागांचा फायदा घेत त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करत होता असे समोर आले आहे.
नराधम दत्तात्रय गाडे हा एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना हेरून त्यांची लुटमार करायचा, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. नराधम दत्तात्रय गाडे याच्याविरोधात शिरूर, शिक्रापूरसह अहिल्यानगरमधील सुपा पोलिस ठाण्यात एकूण ६ गुन्हे दाखल आहेत.
या सहाही गुन्ह्यांमध्ये तक्रारदार महिलाच असून, त्यापैकी एक गुन्हा विनयभंगाचा असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नराधम गाडेचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकृत असून, त्याने यापूर्वीही महिलांसोबत अशाप्रकारे इतरही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
दत्तात्रय गाडेविरोधात दाखल असलेल्या सहाही गुन्ह्यांध्ये तो एकट्या महिलांना फसवून लूटमार करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. बसची वाट पाहणाऱ्या महिलांना चारचाकीत बसवून तो वेगवेगळी कारणं देत निर्जनस्थळी घेऊन जायचा.
तिथे गेल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांना लुटायचा. यानंतर तो पीडित महिलांना अशाच निर्जन स्थळी सोडून पळ काढायचा, असं त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
२०१९मध्ये सुपा पोलीस ठाणे (अहिल्यानगर), कोतवाली पोलीस ठाणे (अहिल्यानगर), शिरूर पोलीस ठाणे (पुणे ग्रामीण) येथे गाडेवर प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला होता. यानंतर सन २०२०मध्ये शिरूर आणि शिक्रापूर पोलिस ठाण्यांत त्याच्याविरोधात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत.
एका गुन्ह्यात आरोपीनं नगरहून पुण्याकडे जाण्यासाठी निघालेल्या महिलेला टार्गेट केलं होतं. तक्रारदार महिला नगर बस स्थानकात बसची वाट पाहत होती. यावेळी आरोपी गाडे तिथे चारचाकी घेऊन तिथे आला. ‘मी देखील पुण्याला चाललो आहे, तुम्हाला सोडतो,’ असं त्याने महिलेला सांगितले.
दरम्यान, पीडित महिलेनं आरोपीवर विश्वास ठेवल्यानंतर त्याने चारचाकी निर्जनस्थळी घेऊन जात तिचा गळा दाबला आणि तिच्याकडील दागिने हिसकावले होते. नगरहून पुण्याला येणाऱ्या इतरही काही महिलांना गाडेनं अशाच प्रकारे टार्गेट केलं होतं, हे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.