मोठी बातमी! गोल्डन बाबा मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या फेऱ्यात, धक्कादायक माहिती आली समोर..
पुणे : सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून अनेकांच्या चौकशा सुरू आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. आता अंमलबजावणी संचालनालयाने ज्योती रंजन बेउरा उर्फ गोल्डन बाबा याच्याविरुद्ध ओडिशातील एका खोट्या प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात ५१ लाख रुपयांची ऑडी कार जप्त केली आहे.
यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. जर्मनीमध्ये बनवलेल्या कारचे Q5 मॉडेल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जप्त करण्यात आले होते. याबाबत आता चौकशी सुरू झाली आहे.
दरम्यान, ईडीने फसवणूक करणारा गोल्डन बाबा विरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. बाबावर ओडिशातील काही व्यावसायिकांना कर्ज देण्याच्या नावाखाली साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
याबाबत अनेकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. ज्योती ट्रेडिंग कंपनीचे एकमेव मालक या नात्याने, ज्योती रंजन बेउरा यांनी त्यांच्या व्यवसायाला आर्थिक सहाय्य देण्यासाठी अनेकांबर करार केले होते.
त्यांनी आगाऊ रक्कम मिळवली आणि बनावट कागदपत्रे तयार करून आगाऊ रकमेची फसवणूक केली. यामुळे चौकशी सुरू झाली आहे.