Crime News : पाण्याचा नळ सुरु ठेवल्याच्या कारणावरुन वाद; घरात घुसुन मारहाण करुन पाडले दात
पुणे : घरातील पाण्याचा नळ सुरु ठेवल्याच्या कारणावरुन वाद झाल्याने दोघांनी घरात घुसून एकाला बेदम मारहाण करुन दात पडल्याची धक्कादायक घटना भिमपुरा कॅम्प पुणे येथून समोर आली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मानस आनंद भौमी (रा. भिमपुरा, मुळ रा. दासपूर, पश्चिम बंगाल) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युसुफ हसन शेख (वय-२८) व उमन जाकीब शेख (वय-२० दोघे रा. भिमपुरा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या शेजारी राहतात. आरोपी त्याच्या घरातील पाण्याचा नळ चालून ठेवत असल्याने फिर्यादी यांना पाणी मिळत नाही.
त्यामुळे फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच घरात घुसून लाथाबुक्क्यांनी तोंडावर, डोळ्यावर ठोसे मारले. यात फिर्यादी यांचे दात पडले आहे.
दरम्यान, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे करीत आहेत