खेड शिवापुर टोल नाक्यावर सापडले ५ कोटींचे ड्रग; ४ जणांना अटक, पुणे पोलसांची मोठी कारवाई


पुणे : पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली असून ५ कोटी रुपयांचे एक किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज जप्त केले आहेत. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाची संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी एकुण चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे अमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जातात.

मिळालेल्या माहिती नुसार, २९ मे रोजी एका वाहनामधून पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्यावर ८५० ग्रॅम ड्रग जप्त करण्यात आले. याप्रकरणी सखोल तपास करताना पुणे पोलिसांनी लोणावळ्याजवळ आणखी २०० ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त केले आहेत.

हे अमली पदार्थ कोणाला विकणार होते आणि कुठून आणले होते, याची माहीती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!