प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, दोघांनी गरोदर केलं, प्रसूतीनंतर घडलं भयंकर, तरुणीचा मृत्यू, घटनेने पुणे हादरले….


पुणे : पुणे शहरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर केले. नंतर प्रसूतीवेळी तिचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, मुलगी १२ वी मध्ये शिक्षण घेत होती. काही महिन्यांपूर्वी तिला उलट्याचा त्रास होऊ लागला. तिची तपासणी केली ती गरोदर असल्याचे समोर आले. यामुळे तिच्या कुटूंबाला धक्काच बसला. फिर्यादी या धुणीभांडी तर, त्यांचे पती मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या घटनेने ते हादरून गेले आहेत.

याबाबत तिने तिचे निखील याच्या सोबत प्रेमसंबंध असल्याचे आणि त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने गरोदर असल्याचे सांगितले होते. तसेच साहील याने देखील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने देखील तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो आपल्याशी लग्न करणार असल्याचे आईला सांगितले होते. मात्र तसे झाले नाही.

नंतर तरुणी आणि तरुण कोल्हापूरला राहायला गेले. याठिकाणी तिने मुलाला जन्म दिला. त्यावेळी तिला त्रास होत असल्याने तिला कोल्हापूरमधील रुग्णालयात दाखल केले. मात्र फरक पडत नसल्याने तिला पुण्याला आणले. डॉक्टरांनी तिच्या अंगात रक्त कमी असल्याचे सांगितले.

त्यानंतर तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेने मात्र पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!