सकाळी उठल्या उठल्या नका करू ‘या’ चुका, नाहीतर आयुष्यावर होईल वाईट परिणाम…

पुणे : दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही, तर पूर्ण दिवस खराब जातो, असा अनुभव अनेकांना येतो. तुम्ही दिवसभर उत्साही राहता आणि तणावही तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. जरी असे बरेच लोक आहेत जे नियमितपणे सकाळच्या निरोगी सवयींचे पालन करतात, परंतु काही चुका आहेत ज्या नकळत आपल्या सकाळच्या सवयींमध्ये समाविष्ट झाल्या आहेत आणि आपल्या आरोग्यावर परिणाम करत आहेत.
सकाळचा निरोगी दिनक्रम केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. मात्र, काहीजण दिवसाची सुरुवात अशा काही चुकीच्या सवयींनी करतात, ज्याचा परिणाम शरीर, मन आणि जीवनावर होतो.
टाळायच्या चुका पुढील प्रमाणे.
सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल पाहणे – आजकाल मोबाईल जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, पण सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहणे डोळ्यांसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे इतर कामांना उशीर होतो आणि घाईगडबड होते.
उशिरा उठणे – पूर्वी लोक सूर्योदयापूर्वी उठत असत, पण आता रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे सामान्य झाले आहे. ही सवय तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. सूर्यप्रकाशाप्रमाणे दिनक्रम ठेवा, म्हणजे सकाळी लवकर उठा आणि रात्री लवकर झोपा.
सकाळी नकारात्मक विचार करणेप – काही लोकांना सकाळी उठल्यावर नकारात्मक विचार करण्याची किंवा बोलण्याची सवय असते. यामुळे तुमचा मूड दिवसभर खराब राहतो. त्यामुळे, सकाळी उठल्यावर देवाचे आभार माना आणि सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करा.
व्यायाम न करणे – असे म्हणतात की सकाळी व्यायाम करणे फिटनेससाठी चांगले असते. असे असूनही आजही अर्ध्याहून अधिक लोक सकाळी उठून व्यायाम करत नाहीत. अशा लोकांना नेहमी कोणत्या ना कोणत्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना अनेकदा लठ्ठपणा आणि गंभीर आजारांचा धोका असतो.
ब्रेकफास्ट न करणे – सकाळची वेळ खूप बिझी असते. प्रत्येकाला ऑफिस किंवा कॉलेजला जाण्याची घाई असते. त्यामुळे लोक नाश्ताही करत नाहीत. ही अशी सकाळची वाईट सवय आहे जी तुम्हाला दिवसभर थकवू शकते. एवढेच नाही तर नाश्ता न केल्याने वजन वाढते आणि तणावासारख्या समस्याही निर्माण होतात.