डोनाल्ड ट्रम्प आत्मसमर्पणासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल ; कडेकोट सुरक्षा व्यवस्था…!


न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी न्यूयॉर्कमध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. २०१६ मध्ये आपल्या निवडणूक प्रचारावेळी अ‍ॅडल्ट फिल्ममध्ये काम करणा-या अभिनेत्रीला गुपचूप पैसे दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

 

फ्लोरिडाहून अडीच तासांच्या विमान प्रवासानंतर डोनाल्ड ट्रम्प गार्डिया विमानतळावर उतरले. त्यानंतर ते न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरमध्ये गेले. मंगळवारी दुपारी ते मॅनहॅटन कोर्टहाऊसमध्ये जाणार आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे कोर्टात हजर होण्यापूर्वी आजूबाजूचा परिसर तसेच ट्रम्प टॉवरभोवती कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. बॅरिकेड्ससोबतच ठिकठिकाणी काटेरी ताराही लावण्यात आल्या आहेत.

 

 

न्यूयॉर्कचे महापौर अ‍ॅडम्स यांनी असा इशारा दिला की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक महाभियोगादरम्यान हिंसकपणे निषेध करणा-या कोणालाही अटक केली जाऊ शकते. दुसरीकडे, या सर्व प्रकरणांवर डोनाल्ड ट्रम्प यांचे वकील जो टॅकोपिना म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प लढाईसाठी तयारी करत आहेत आणि ते स्वत:ची बाजू मांडणार आहेत.

 

ट्रम्प यांनी २०१६ मध्ये आपल्या निवडणूक प्रचारावेळी अ‍ॅडल्ट फिल्ममध्ये काम करणा-या अभिनेत्रीला गुपचूप पैसे दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.

मॅनहॅटन ग्रँड ज्युरींनी गेल्या आठवड्यात सुनावणी केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आज मॅनहॅटन न्यायालयात हजर होतील. अभियोगाला सामोरे जाणारे ते पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष असतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!