जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस अधिकारी, पुण्याचा एकाच परप्रांतीय घरातील तिघे बघणार कारभार, नवरा बायको अन् मेव्हणा…


पुणे: शहरात आता एक आगळा वेगळा इतिहास झाला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून यापूर्वी साताऱ्याचा कारभार पाहणारे जितेंद्र डुडी यांची नियुक्ती केली आहे. तसेच त्यांच्या पत्नी आंचल दलाल या पुणे जिल्ह्याच्या राखीव पोलीस दलाच्या अधिकारी म्हणून नियुक्त आहेत. यामुळे पती-पत्नी यांची नियुक्ती एकाच ठिकाणी झाली आहे.

असे असताना आता यात अजून भर म्हणून त्यांचे मेहुणे शेखर सिंह डुडी पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्त पदावर आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघा जणांकडे पुण्याच्या महत्त्वाच्या पदांचा पदभार असणार आहे. याची चर्चा सध्या सुरू आहे.

डुडी कुटुंब हे राजस्थानचे जयपूर जिल्ह्यातील आहे. तसेच त्यांची सुरुवात झारखंडमधून सुरुवात झाली होती. दोघांनी देखील याच क्षेत्रात काम करायचे पूर्वीपासून ठरवले होते. तसेच यश देखील त्यांना मिळाले. केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते.

यापूर्वी त्यांनी जुन्नर प्रांताधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सातारा जिल्हाधिकारी म्हणून पदभार भूषवलेला आहे. यामुळे अनेक ठिकाणी काम करण्याचा मोठा अनुभव त्यांना आहे. आता पुण्यात याचा फायदा होणार का? हे लवकरच समजेल.

दरम्यान, जितेंद्र डुडी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते. आता सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी जितेंद्र डुडी यांची जिल्हाधिकारी पदी नियुक्ती केली आहे. पुणे जिल्ह्यातील आव्हाने आता वेगळी असणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!