अजित पवारांबाबत अमित शहांशी चर्चा! भाजपच्या बड्या नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट
मुंबई : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजप प्रवेशाच्या बातम्या येत आहेत. काल मात्र अजित पवार यांनी याला नकार दिला आहे. असे असताना भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
शेलार म्हणाले, अजित पवारांच्या विषयावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आहे. शहा यांच्याशी काय चर्चा झाली, याचा तपशील मी सांगणार नाही. मात्र, अजित पवारांना भाजपसोबत यायचे असेल तर त्यांना वैयक्तिक निर्णय घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.
शेलार यांनी याबाबत अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. अजित पवार यांच्याबद्दल वारंवार अनेक गौप्यस्फोट केले जात आहेत. याला खुद्द अजित पवार यांनी पूर्णविराम दिला.
दरम्यान, अजित पवार यांनी काल आपण राष्ट्रवादीतच राहणार असून महाविकास आघाडीसोबत काम करणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय घडामोडी घडणार हे लवकरच समजेल.