अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन…!

मुंबई : बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी हे जग सोडले.
अभिनेते अनुपम खेर ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अनुपम खेर यांनी ट्विट केले, मला माहित आहे ‘मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे!’ पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिक बद्दल असे लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती!
Views:
[jp_post_view]