थेट मुलाखत अन् ८० हजार पगार!! पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी, जाणून प्रक्रिया….

पुणे : रोजगाराच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीमध्ये वरिष्ठ निवासी, शिक्षक आणि कनिष्ठ निवासी अशा एकूण 29 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

यामध्ये इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखत प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. यासाठी मुलाखती 13 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केल्या जाणार आहेत. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – 411011 याठिकाणी मुलाखती होणार आहेत.
यामध्ये ज्या उमेदवारांना या पदांमध्ये रुचि आहे, त्यांनी 13 फेब्रुवारीला मुलाखतीसाठी सहभागी होण्याची संधी गमावू नये. यामध्ये वरिष्ठ निवासी – ₹80,250/- प्रति महिना शिक्षक – ₹64,551/- प्रति महिना, कनिष्ठ निवासी – ₹64,551/- प्रति महिना असा पगार दिला जाणार आहे.

यामध्ये उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे सांगितले गेले आहे. यामध्येवरिष्ठ निवासी – 15 जागा शिक्षक – 02 जागा, कनिष्ठ निवासी – 12 जागा प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी आहे.
उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. यामुळे ज्यांना कोणाला यामध्ये जायचं असेल त्यांनी याठिकाणी उपस्थित राहून मुलाखत देणे गरजेचे आहे.