Dinesh Phadnis Death : कलाविश्वावर शोककळा! ‘सीआयडी’ फेम दिनेश फडणीस यांचे निधन, वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Dinesh Phadnis Death : सीआयडी फेम दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर आज मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. पण सोमवारी रात्री अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. सोमवारी रात्री १२ वाजता दिनेश फडणीस याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे.

अभिनेत्यावर मंगळवारी ५ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार ‘सीआयडी’ शोची संपूर्ण टीम आताच्या घडीला दिनेश याच्या निवासस्थानी आहे. Dinesh Phadnis Death

दिनेश फडणीस याने अनेक मालिका, शो, सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचे मनोरंजन केले . पण दिनेश याला ‘सीआयडी’ मध्ये फ्रेड्रिक्स ही भूमिका साकारल्यानंतर लोकप्रियता मिळाली.

‘सीआयडी’ शो आता प्रसारित होत नसला तरी, शोमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!