जागृत ग्राहकराजा संघटना पुणे जिल्हा अध्यक्षपदी दिलीप निंबाळकर यांची निवड, ग्राहक चळवळीतील कामाची मिळाली पोचपावती…

इंदापूर : सणसर येथील दिलीप निंबाळकर यांची जागृत ग्राहक राजा पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दिलीप निंबाळकर हे गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहक चळवळीत ग्राहक प्रबोधनाचे काम करत आहेत. अनेकांचे प्रश्न सोडवून त्यांनी नागरिकांना न्याय देण्याचे काम केले आहे. यामुळे याबाबत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत निंबाळकर म्हणाले, पुणे जिल्ह्यात संघटना प्रत्येक तालुक्यात वाढवणार, जिल्ह्यात मेळावे, ग्राहक प्रबोधन, विविध सामाजीक कार्यक्रम घेणार व संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार असे सांगीतले. ग्राहकांची फसवणूक तसेच त्यांचे हक्क अधिकर यासाठी काम करणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले आहे.
तसेच इंदापुर तालुका अध्यक्ष पदी शत्रुघ्न घाडगे यांची निवड करण्यात आली. इंदापुर तालुक्या संघटना वाढीसाठी व ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार असे सांगीतले. मध्यवर्ती कार्यालय आर्यन स्कूल कॉर्पोरेट ऑफिस नऱ्हे नवले ब्रिज पुणे येथे दिलीप फडके सर संघटक महाराष्ट्र राज्य, यांचे हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी श्री नागनाथ स्वामी सर सचिव महाराष्ट्र राज्य, श्रीमती वसुधाताई सावरकर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, शैलाताई शिळमकर महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सौ दुर्गाताई शुक्रे महिला अध्यक्ष पुणे महानगर, सविता बलकवडे महिला सचिव महाराष्ट्र राज्य यांच्यासह अनेक पदाधिकरी उपस्थित होते.