Dhananjay Munde : ब्रेकिंग! धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? नागपूरमध्ये हालचालींना वेग…

Dhananjay Munde : काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी सापडले आहेत, ते सर्व आरोपी धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याच्या संपर्कातील आहेत. तसेच कराड याच्यावर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचाही गुन्हा दाखल आहे.
या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळात सभागृहात येणारे धनंजय मुंडे हे मागील दोन दिवसांपासून मात्र विधिमंडळाकडे फिरकलेच नाहीत. मुंडे यांच्या गैरहजरेची आता सर्वपक्षीय आमदारांमध्ये चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागेल असेही सांगितले जात आहे. Dhananjay Munde
असे असताना आता मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या चर्चेनंतर आज धनंजय मुंडे अजित पवार व नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे यामध्ये नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सत्ताधारी महायुतीतील भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. हत्या प्रकरणातील आरोपींचे जे आका आहेत ते धनंजय मुंडे यांचे शागिर्द आहेत.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर संबंध असले तरी त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.