Dhananjay Munde : आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची!! मंत्री धनंजय मुंडे यांचे राजकारणातील मोठं वक्तव्य..


Dhananjay Munde: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

याचपार्शभूमीवर राज्यात मागील काही दिवसांपासून महायुतीत संघर्ष असल्याच्या चर्चा होत्या. मराठवाड्यात तसेच महाराष्ट्रात दौऱ्यावर असणारे महायुतीतले नेते नकार देत असताना राष्ट्रवादीकडून भाजप शिंदे गटाची कोंडी केली जाते अशा चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची ते. आम्ही आधी जागा निश्चित करू मग उमेदवार जाहीर करू असं कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणालेत. विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचं सांगत विनाकारण आम्हाला घेरण्याचा प्रयत्न होत असल्याचंही ते म्हणाले आहे. Dhananjay Munde

राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस येतोय. या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी मराठवाड्यातील काही भाग व पूर्व विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाले होते.

या ठिकाणी मदत देण्याचाही निर्णय झालाय. तीनशे कोटींचा निधी देण्यात आला. आता पुण्यात ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे नुकसान झालं तिथे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. तिथेही लवकरच आर्थिक मदत केली जाईल, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!