Dhairyasheel Mohite Patil : अखेर ठरलं! धैर्यशील मोहिते पाटील उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, म्हणाले, नेट प्रॅक्टिस संपली, आता…


Dhairyasheel Mohite Patil : सोलापूर जिल्हा संघटनेचे सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा राजीनामा देऊन पक्षाला मोठा धक्का दिला आहे. पक्षाचा राजीनामा देण्यामागे त्यांनी वैयक्तिक कारण दिले आहे. ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आता यावर त्यांनी भाष्य केले आहे.

धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, विचारपूर्वक आणि संयमाने आम्ही पावले उचलत आहोत. आम्हाला माहिती आहे की आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला आमची भूमिका ऐकण्याची घाई झाली आहे. १४ तारखेला जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे.

आता नेट प्रॅक्टिस संपली असून १४ तारखेपासून खऱ्या अर्थाने बॅटिंग करणार असल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले. विरोधकांकडे खूप आमदार असतील पण मते देणारी जनताच आमच्या बाजूला असल्यामुळे आम्ही निश्चिंत असल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले आहे.

माढा मतदारसंघात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अनेकांची नावे रोज चर्चेत येत होती. पवारांच्या पक्षाने दोन उमेदवारयाद्या प्रसिध्द केल्या पण त्यात धैर्यशील मोहिते पाटलांचे नाव येत नव्हते.

त्यामुळे माढा मतदारसंघात संभ्रम वाढला होता. मोहिते-पाटील यांना पवार उमेदवारी देणार का?, धैर्यशील मोहिते-पाटील अपक्ष उभारणार? की भाजप त्यांची समजूत काढणार? असे अनेक प्रश्न लोकांना पडले होते.

अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या भाजपमधील पदांचा राजीनामा दिला आणि आपण शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्ष प्रवेश करण्यापूर्वीच व अधिकृतरीत्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वीच धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हे चिन्ह मतदारसंघाच्या घराघरांत पोहोचवले आहे. येत्या १४ एप्रिल रोजी पक्षप्रवेशानंतर आणि १६ रोजी फॉर्म भरल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

दरम्यान, मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांनी मोहिते-पाटलांशी जुळवून घेण्याची भूमिका घेतल्याने भाजपसमोर नवा प्रश्न उभा राहिला आहे. माढ्याच्या मैदानात आता खऱ्या अर्थाने चुरशीचा सामना पाहावयास मिळेल. पवार यांनी टाकलेल्या या डावावर भाजप या मतदारसंघात कशी पावले उचलते यावर बरेच काही अवलंबून आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!