Devendra Fadnavis : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला जालन्यात दाखवले काळे झेंडे…
Devendra Fadnavis : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असून याचा फटका राजकीय दौऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
याचपार्शभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला जालन्यात काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना दौऱ्यावर असताना बदनापूर या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या उद्घाटनासाठी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बदलापूर शहरात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांचा ताफा दिसताच त्याला काळे झेंडे दाखवले.
दरम्यान, फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे. मात्र आरक्षणासाठी आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे.