Devendra Fadnavis : शरद पवार यांनीही सोबत येण्याचा शब्द दिला होता पण….! देवेंद्र फडणवीस यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी होणार आहे. आता प्रचाराची रंगत वाढली असून नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. दरम्यान, अद्याप काही ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून नेत्यांकडून ती नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे. मात्र भाजप कार्यकर्त्यांनीफडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीवर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, बारामतीतून सुनेत्रा पवार निवडणूक लढणार नाहीत तोपर्यंत ही खरी लढाई आहे असं वाटणार नाही असं भाजपचे वरिष्ठ नेते म्हणायचे. त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे म्हणून बारामतीतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. Devendra Fadnavis
दरम्यान, २०१९ मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी केला होता. मात्र दोन दिवसात सरकार कोसळलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा अजित पवार भाजपसोबत हातमिळवणी केली.
याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनीही सोबत येण्याचा शब्द दिला होता. पण त्यांनी नंतर शब्द बदलला. भाजप कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे.