Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेबाबत धक्कादायक माहिती आली समोर…


Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची घटना काल उघडकीस आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करणाऱ्या महिलेबदद्ल मोठा दावा करण्यात आला आहे. या महिलेची ओळख पटली असून ही महिला मनोरूग्ण असल्याची माहिती समोर येत आहे.

अशातच भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षदा तेंडूलकर यांनी मोठा दावा केला आहे. ही महिला पूर्ण सोसायटीसाठी डेंजर आहे. तिचं कुणीच नाही. ती एकटी राहते. तिचं लग्न झालेले नाही. ती असेच वागते. तिची बहीण देखील सोडून गेलेली आहे. तिची मोठी बहीण देखील तिला घाबरुन इथे राहत नाही. Devendra Fadnavis

म्हणजे आता काय बोलायचं? मानसिक अस्वस्थ कुणीही होऊ शकते. त्यांना ट्रिटमेंटची गरज आहे. तिचं नाव धनश्री सहस्त्रबुद्धे असे आहे. तिचे वय माझ्यामध्ये ३६ इतके असेल. तिचं लग्न झालेले नाही. ती सिंगल आहे. तिला सलमान खान बरोबर लग्न करायचे आहे. सारखे तिचे सुरु असतं की, मला सलमान खान याच्याकडे घेऊन जा. आता मी काय बोलू?, असं अक्षदा तेंडूलकर यांनी सांगितलं.

अक्षदा तेंडूलकर यांनी पुढे असेही सांगितले की, ती तिच्या बाबांना खूप त्रास द्यायची. त्यांचे वय ९२ इतके होते. ते वयस्कर होते. त्यांना ती खूप त्रास द्यायची. त्यांनी हिच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. दीड वर्षाआधी ही घटना घडली होती, अशी माहिती भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षदा तेंडूलकर यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!