Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका, देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप…


Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. येथील प्रकल्प गुजरातला चालले आहेत.

महाराष्ट्र क्रमांक एकवर असताना या सरकारच्या काळात तो सहाव्या क्रमांकावर गेल असून राज्य मागे जात आहे, अशी टीका केली. यानंतर पिंपरी-चिंचवडमधील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर कडक शब्दांत टीका आहे.

त्यांनी पवार यांना फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक असे संबोधले आणि आरोप केला की, विरोधक महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटी माहिती पसरवतात. Devendra Fadnavis

फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात गुजरातकडे उद्योग स्थलांतरित होण्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे, आणि राज्यात अजूनही सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक येत आहे. त्यानुसार, ५२% विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रातच आली आहे.

फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केले की, महाराष्ट्र हा औद्योगिक दृष्टिकोनातून मजबूत आहे आणि विरोधकांद्वारे पसरवलेली माहिती फसवी आहे. त्यांच्या मते, राज्यातील औद्योगिक स्थान आणि IT क्षेत्र अजूनही उत्तम स्थितीत आहे. ते म्हणाले, आमच्या सरकारने महाराष्ट्राला गुंतवणुकीसाठी आदर्श ठिकाण बनवले आहे.

दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आणि त्यांना “फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीची व्यवस्थापिका” म्हणून संबोधले. फडणवीसांनी सुळे यांच्या हिंजवडीमधील IT कंपन्या स्थलांतरित होण्याबद्दलच्या वक्तव्याला चुकीचे ठरवले आणि त्याला जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!