Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार!! भाजपच्या वरिष्ठ नेत्याने केली घोषणा…

Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. अशातच भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे भाकीत केले आहे.
या नेत्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर केले आहे. आज किंवा उद्या भाजप नेत्यांची बैठक होऊन पक्षाचा गटनेता ठरवला जाईल, असे या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर जाहीर केले आहे.
सोमवारी किंवा मंगळवारी भाजपच्या विधीमंडळ पक्षाचा गटनेता निवडला जाईल. त्यात फडणवीसांची निवड होईल आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. असे नाव न सांगण्याच्या अटीवर भाजप नेत्याने ही माहिती दिली आहे.
दुसरीकडे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित झालं असून भाजपचे वरिष्ठ नेते यावर शिक्कामोर्तब करतील, अस स्पष्ट केलं होतं. ‘पुढचा मुख्यमंत्री कोण होणार?’ हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही वरिष्ठांनी या नावावर शिक्कामोर्तब करण्याची वाट पाहत आहोत,असे रावसाहेब दानवे म्हणाले होते. Devendra Fadnavis
दरम्यान, राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुरू असताना एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी गेल्याने देखील राजकीय चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गावावरून परतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
शिंदे म्हणाले की, ‘मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत.