Devendra Fadnavis : माढा लोकसभा मतदार संघात फडणवीसांचा पवारांवर मोठा डाव, आता चित्रच बदलणार? मोहिते, पवारांना मोठा धक्का…


देशात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीची तसेच राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. महाविकास आघाडी आणि महायुतीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पण काही जागांवर पेच कायम आहे.

अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते- पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात फडणवीसांनी मोठा डाव टाकून विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांना सोबत घेतलं आहे.

तसेच शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांना देखील आपल्या सोबत घेतलं आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते- पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. याचा निवडणुकीवर परिणाम होईल.

दरम्यान, शरद पवारांनी माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी जाहीर करून तर उत्तम जानकरांना सोबत घेऊन अजित पवारांची शरद पवारांनी डोकेदुखी वाढवली होती. यामुळे माढ्यात भाजप बॅकफूटवर गेल्याची सुरु चर्चा होती. पण अखेर देवेंद्र फडणवीसांनी मोठा डाव टाकला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!