देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू, रविंद्र चव्हाण यांची महाराष्‍ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड…


पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजपाची धुरा कोणाच्या हाती दिली जाणार, याची सर्वांनाच उत्सुकता लगली होती. आता मात्र ही उत्सुकता संपली आहे. आज (ता १ जुलै) भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला राज्यात एक कायमस्वरुपी प्रदेशाध्यक्ष मिळावा, अशी भावना व्यक्त केली जाऊ लागली.

त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदासाठी योग्य चेहऱ्याचा शोध घेतला जाऊ लागला. रविंद्र चव्हाण यांच्याकडे अगोदरपासूनच महाराष्ट्र भाजपाचे कार्यकारी अध्यक्षपद होते. त्यामुळे तेच या पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे एकमत भाजपात झाले.

ठरल्याप्रमाणे त्यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. या निवड प्रक्रियेत अन्य कोणत्याही नेत्याने अर्ज न केल्यामुळे रविंद्र चव्हाण यांची आज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, रविंद्र चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय नेते आहेत. सर्वप्रथम २००७ साली ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले.नंतर २००९ साली विधानसभा निवडणूक लढवून ते आमदार झाले.

त्यानंतर २०१४ सालीही त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. त्यानंतर ते आमदार असताना कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर,ठाणे,पनवेल महापालिकेत भाजपाचा बोलबाला पाहायला मिळाला.

रविंद्र चव्हाण हे पालघरचे पालकमंत्री राहिलेले आहेत. २०२९ साली रविंद्र चव्हाण हे तिसऱ्यांदा आमदार झाले. २०२१ साली त्यांना मंत्रीपदही देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते मंत्री होते. त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही काम केलेले आहे. रविंद्र चव्हाण २०२४ साली चौथ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत गेले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!