लाडक्या बहिणीमुळे विकास कामांना ब्रेक? अजित पवार गटाच्या मंत्र्याचं वक्तव्य


पुणे : महायुती सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेमुळे माहितीमध्ये वादाचे फटाके फुटत आहेत. या योजनेच्या निधीवरून वाद होत असताना आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांना उशिरा निधी मिळत असल्याच वक्तव्य केल आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार खास आपल्या शैलीत दत्तात्रय भरणे यांना त्या वक्तव्याबाबत विचारणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विकासासाठी आवश्यक असलेला निधी वेळेवर मिळत नाही, कारण तो लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जातो असा आरोप करत राज्यातील आर्थिक प्राधान्य क्रमाकावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दरम्यान या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांना कोणता निधी मिळाला नाही हे विचारणार असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महायुती सरकार सतेत आणण्यात गेम चेंजर ठरली. या योजनेवर बोलताना आता सत्ताधारी गटातील आमदारानेच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याच्या या योजनेसाठी अन्य विकास कामांचा निधी वळवला जात असल्याचा आरोप देखील अजित पवार गटातील मंत्र्यांकडून समोर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!