Dev Anand : अभिनेते देव आनंद यांच्या जुहूच्या बंगल्याचा सौदा तब्बल ४०० कोटींना, बंगला पाडून बांधणार इमारत…


Dev Anand मुंबई : बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते असे व्यक्तिमत्व असलेले देव आनंद हे आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. देव आनंद आता या जगात नसले तरी चाहते आजही त्यांची आठवण काढतात.  त्याचे सिनेमे आजही तितक्याच आवडीने पाहिले जातात. मात्र आता देव आनंद हे त्याच्या आलिशान बंगल्यामुळे कारणामुळे चर्चेत आले आहेत. Dev Anand

देव आनंद (Dev Anand)  यांनी आपल्या आयुष्यातील ४० ज्या बंगल्यात घालवली तो बंगला आता विकण्यात आल्याचा दावा मिडीया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. देव आनंद यांचा मुंबईतील जुहू येथील बंगला एका रिअल इस्टेट कंपनीतील एका बिल्डरला ४०० कोटींना विकण्यात आल्याची माहिती आहे.

सर्व करार झाला असून कागदोपत्री काम सुरू झाले आहे. हा बंगला ३५०-४०० कोटी रुपयांना विकण्यात आला आहे. इतकच नाही तर आता हा बंगला पाडून आता येथे २२ मजली उंच इमारत बांधली जाणार आहे.

बंगला विकण्यामागचे मुख्य कारण आता मुंबईत देव आनंद यांचा कोणताही वारस नसणे हे मानले जात आहे. २०११ मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा सुनील आनंदही क्वचितच येथे येतो. त्याने आपले कुटुंब लंडनमध्ये स्थायिक केले आहे. देव आनंद यांची मुलगी देविना आता उटी येथे राहते.

देव आनंद यांचा मुलगा सुनील, मुलगी देविना आणि पत्नी कल्पना यांच्या नावावर हा बंगला आहे. आता या बंगल्याच्या जागेवर २२ मजली इमारत बांधण्यात येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!