औरंगजेबाची कबर तोडा, 1 कोटी घेऊन जा!! बड्या नेत्याने केली थेट घोषणा…


नागपूर : काही दिवसांपासून सुरु झालेला औरंगजेबावरुन झालेला वाद थांबण्याच नाव घेत नाही. हा वाद आता राज्याच्या बाहेर गेला आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये औरंगाबाद गावाच्या बोर्डाला काळ फासण्यात आलं आहे. यामुळे वातावरण तापले आहे. हिंदू संघटनांनी औरंगजेब आणि त्याचा वजीर अबू मोहम्मद खान यांची कबर तोडणाऱ्याला कोट्यवधी रुपये बक्षीस जाहीर केले आहे.

हिंदूत्ववादी नेता सचिन सिरोही म्हणाले की, ‘मेरठमध्ये हिंदूचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. औरंगजेबाच वजीर अबू मोहम्मद खानची कबर मेरठमध्ये आहे. त्याला आबूचा मकबरा सुद्धा म्हटलं जातं. त्याशिवाय मेरठचा प्रमुख बाजार आबूलेनच नाव अबू मोहम्मद खान ठेवण्यात आलय. सचिन सिरोहीने अबूचा मकबरा म्हणजे त्याची कबर तोडणाऱ्याला 50 लाखाचा इनाम देण्याची घोषणा केली आहे.

तसेच नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर तोडणाऱ्याला एक कोटीच इनाम देण्याची घोषणा करण्यात आली आहे. असं केल्याने भारताचा गौरवशाली सुरक्षित होईल, हे पैसे समाजातून गोळा करण्यात येतील. महाराष्ट्र सरकार किंवा उत्तर प्रदेश सरकारने मजारवर बुलडोझर चालवला, तर हे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील, असेही त्याने म्हटले आहे.

यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे कबर असलेल्या ठिकाणी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. हिंदुंचा गौरवशाली इतिहास वाचवण्यासाठी आणि पुनर्स्थापित करण्यासाठी जागरुक व्हावं लागेल, असं सचिन सिरोही म्हणाला. हिंदुंच्या इतिहासाच संरक्षण करण्यासाठी त्यांनी सरकारला अपील केलय.

तसेच भारतावर आक्रमण करणाऱ्यांची प्रमुख स्थानांना दिलेली नाव बदलून क्रांतीकारकांची नाव देण्याच आवाहन त्यांनी सरकारला केलय. असं सिरोही यांचं मत आहे. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार याबाबत काही सांगता येणार नसले तरी याबाबत परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group