धनंजय मुंडेंनी ‘ती’ फाईल गायब केली? उपसचिवांनी केला खुलासा, खळबळजनक आरोप करत दमानियांनी सरकारी पत्रच दाखवलं…


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुडेंवर कृषीमंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले होते. अशातच आता अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

कृषी सचिव व्ही. राधा यांनी तयार केलेली आणि कृषी विभागातील भ्रष्टाचाराचा अहवाल असलेली फाईल मुंडेंनी गायब केली असल्याचा दावा दमानियांनी केला आहे. धनंजय मुंडेंवर यापूर्वीही 200 कोटी ते 245 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

भाजप आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, तर अंजली दमानियांनी हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान मुंडेंना मिळालेला दिलासा म्हणजे क्लीन चीट नसल्याचं म्हटलं होतं. आता, लोकायुक्तांसमोर सुरू असलेल्या चौकशीत दमानियांनी नवा खुलासा केला आहे.

दमानियांच्या मते, कृषी सचिव व्ही. राधा यांनी भ्रष्टाचारासंदर्भातील फाईल मंत्र्यांकडे पाठवली होती. मात्र, राजीनाम्यानंतर ती फाईल परत आली नाही. लोकायुक्तांच्या सुनावणीदरम्यान उपसचिव प्रतिभा पाटील यांनीही ही बाब कन्फर्म केली. म्हणजेच फाईल मंत्र्यांकडे दिल्याचा नोंद क्रमांक आहे, पण ती आजवर परत आलेली नाही

दमानियांनी ट्विटरवर शासनाकडून मिळालेलं पत्र शेअर केलं आहे. त्यात नमूद आहे की, विशेष कृती योजनेअंतर्गत तक्रारीवर कृषि आयुक्तालयाने अहवाल सादर केला होता. तो अहवाल तत्कालीन कृषिमंत्र्यांकडे पाठवला गेला. पण, कार्यासनाकडे तो अहवाल परत आलेला नाही. त्यामुळे, माजी कृषिमंत्र्यांच्या खासगी सचिवांकडे पत्राद्वारे अहवाल मागवण्यात आला आहे.

दरम्यान, अंजली दमानिया म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी कृषी सचिव व्ही. राधा यांची भ्रष्टाचारावरील फाईल गायब केली आहे. आता लोकायुक्तांसमोर याचा अधिकृत खुलासा झाला आहे. त्यांनी ट्विटरवर पत्र आणि तपशील पोस्ट करत या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!