उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द; काय आहे कारण?
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. फडणवीस यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा नियोजित होता. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कोल्हापुरात जाणार होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज कोल्हापूरचा नियोजित दौरा होता. पण त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. कानाचा त्रास होत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आपला नियोजित रद्द केल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांना विमान प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आणि त्यामुळे कोल्हापूर पर्यंतचा विमान प्रवास फडणवीस यांनी टाळला आहे. आणि म्हणूनच ते कोल्हापूरच्या नियोजित दौऱ्यावर येणार नाहीत, असं दीपक केसरकर यांनी सांगितले.
दरम्यान, ‘शासन आपल्या दारी’ या अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यासाठी मुंबईतून रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहातून रवाना झाले असल्याची असल्याची माहिती आहे.