दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ५ फेब्रुवारीला मतदान आणि ‘या’ दिवशी निकाल…


नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे. ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली.

दिल्लीत ७० सदस्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीला संपत आहे. २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा ६ जानेवारीला झाली होती. आता आज निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी ही तारीख जाहीर केली आहे.

दिल्लीत विधानसभा निवडणूक ही तिरंगी होणार असून यामध्ये आम आदमी पार्टी तसेच भाजप आणि काँग्रेस लढणार आहेत. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळीही नवी दिल्लीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

त्यांचा सामना काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याशी आहे. केजरीवाल मागच्या दोन निवडणुकीत इथूनच जिंकून विधानसभेत आले. आता यावेळी गणित बदलणार की तसच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली ही VIP सीट आहे. भाजप आणि काँग्रेस दोघांनी आपल्या स्टार नेत्यांना उतरवलं आहे. तसेच विद्यमान मुख्यमंत्री आतिशी कालकाजीमधून विधानसभा निवडणूक लढवत आहे. ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. यामुळे सगळे पक्ष कामाला लागले आहेत.

दरम्यान, गेली 10 वर्षे आप ची सत्ता दिल्लीत आहे. आता भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात जावं लागल्याने त्यांनी आता लोक निवडून देतील तेव्हाच मी मुख्यमंत्री होईन असे म्हणत आतिशी यांना ते पद दिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!