Deepak Mankar : आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल; अजितदादांचा शब्द, मानकरांचा राजीनामा मागे, आता अधिक जोमाने करणार पक्षाचा प्रचार…


Deepak Mankar : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी आपल्यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील पक्षांमधली बंडाळीही समोर येताना दिसते आहे. काही पक्षात उमेदवारांचा प्रवेश होताना दिसत आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेवर संधी न दिल्याने अनेक पदाधिकारी नाराज आहेत. दरम्यान पक्षाच्या विविध पदावरून जवळपास ८०० हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता.

दरम्यान, हजारो कार्यक्रम घेऊन पक्षाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. असे असताना, पक्षाने संधी न दिल्याची सल कार्यकर्त्यांच्या मनात आहे. पक्षाने मला ताकद दिली, तर कार्यकर्त्यांना ताकद मिळणार आहे, याचा पक्षाला विसर पडत आहे, अशी प्रतिक्रिया दीपक मानकर यांनी दिली होती. Deepak Mankar

मानकर यांच्या समर्थनासाठी पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे जाहीर केले होते. कोणाचाही राजीनामा मंजूर करणार नाही असे अजित पवार यांनी सांगितले असल्याची माहिती मानकर यांनी दिली.

आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल असा शब्द उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला. त्यामुळे राजीनामा देणार नाही, उलट पक्षाचे काम पूर्ववत अधिक जोमाने करणार असल्याचे मानकर यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, आज (ता.१८) शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अचानक मानकर यांनी राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. पवार यांनी पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला आहे, त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणूक नियोजनासाठी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!